महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये दीड तास धुव्वाधार पाऊस; वातावरणात गारवा

आज दुपारी दीड तास धुव्वाधार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यावेळी नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. यवतमाळ शहरातील वाघापूर, पिंपळगाव, लोहारा, पाटीपुरा तलाव फैल या भागातील काही घरातील पाणी शिरले. मात्र, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

यवतमाळमध्ये दीड तास धुव्वाधार पाऊस
यवतमाळमध्ये दीड तास धुव्वाधार पाऊस

By

Published : Jul 23, 2020, 10:21 PM IST

यवतमाळ : हंगामाच्या सुरुवातीला दडी मारलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मागील आठवड्यात पावसाने हजेरी लावून परत एकदा पाठ फिरवली होती. तर, आज (गुरुवार) दुपारी दीड तास धुव्वाधार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यावेळी नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. यवतमाळ शहरातील वाघापूर, पिंपळगाव, लोहारा, पाटीपुरा तलाव फैल या भागातील काही घरातील पाणी शिरले. मात्र, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

यवतमाळमध्ये दीड तास धुव्वाधार पाऊस; वातावरणात गारवा

गेल्या आठवडाभरापासून दडी मारुन बसलेला पाऊस अखेर आज बरसला. हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. तर, बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले. अशातच पावसाने पाठ फिरवली होती. तर, या मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतशिवार चिंब भिजले होते.

यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. ती आज दुपारी पूर्ण झाली. विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार पाऊस कोसळला. कोरोनाला रोखण्यासाठी शनिवारपासून यवतमाळ शहर लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे खरेदीसाठी आज बाजारपेठेत गर्दी झाली होती. तर, पावसामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाल्याचे चित्र बघावयास मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details