यवतमाळ- अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असताना राळेगाव शहरात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीत त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपंचायत राळेगावबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.
पावसाचे पाणी शिरले घरात, राळेगाव पंचायतीविरोधात नागरिकांचा संताप - rain fall in yavatmal
राळेगाव नगरपंचायत अस्तित्वात आली, तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने जिल्ह्यात नेहमीच चर्चेत असते. नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते असो किंवा सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या असो, ही सर्वच कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत
राळेगाव नगरपंचायत अस्तित्वात आली, तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने जिल्ह्यात नेहमीच चर्चेत असते. नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते असो किंवा सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या असो, ही सर्वच कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अवकाळी पावसामुळे प्रभाग क्रमांक 12 मधील तसेच शहरातील काही प्रभागातील लोकांच्या घरात नगरपंचायतीच्या नियोजन शून्य कामामुळे पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांच्या संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांच्या घरातील अन्न धान्य ओले झाले. परंतु, नगराध्यक्षांसह एकाही नगरसेवकानी किंवा मुख्याधिकारी यांनी नुकसानग्रस्त घरांना साधी भेटसुद्धा दिली नाही. त्यामुळे नगरपंचायत राळेगावबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.