यवतमाळ - जिल्ह्यात बुधवारी अनेक ठिकाणी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे, तर खरिपातील नगदी पीक कापूस ओला झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यवतमाळमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस, पिकांना फटका - heavy rain yavatmal
नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून जिल्ह्यातील काही तालुक्यात तुरळक, कुठे जोरदार पाऊस हजेर लावत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना चांगलाच फटका बसला आहे.
यवतमाळमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस
नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून जिल्ह्यातील काही तालुक्यात तुरळक, कुठे जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तसेच तूर पिकाला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तसेच ढगाळी वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. तसेच त्याचे आर्थिक गणित बिघडत आहे.