यवतमाळ- राळेगाव तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. पूराचे पाणी ऐकुर्ली व आस्टोना गावात शिरले असून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शेतात पिकांचेही नुकसान झाले आहे.
राळेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस... ऐकुर्ली, आस्टोना गावात पुराचे पाणी - राळेगाव पाऊस बातमी
मुसळधार पावसामुळे राळेगाव तालुक्यातील ऐकुर्ली व आष्टोना गावालगतच्या नाल्याला पूर आला आहे. नाल्याचे पाणी शेजारील गावात शिरले आहे. याआधी देखील या गावात पाणी शिरले होते.
मुसळधार पावसामुळे राळेगाव तालुक्यातील ऐकुर्ली व आष्टोना गावालगतच्या नाल्याला पूर आला आहे. नाल्याचे पाणी शेजारील गावात शिरले आहे. याआधी देखील या गावात पाणी शिरले होते. तेव्हा खासदार भावना गवळी यांनी आष्टोना गावाला भेट देऊन नाल्याच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करुन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आजही ते आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. जर पाऊस सतत चालू राहिला तर पूर्ण गाव पाण्याखाली जाऊ शकते. त्यामुळे त्वरित नाल्यावर संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी गावकरी करत आहे. या दोन्हीही गावांना तहसीलदार डॉ. रवींद्र कणडजे यांनी भेट दिली असून नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यात आदेश दिले आहे.