महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटंजी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस - जोरदार

जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.

घाटंजी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

By

Published : Jun 3, 2019, 9:53 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे हवेत थोडासा गारवा पसरला आहे. मात्र, या पावसामुळे घाटंजीपासून 5 किलोमीटरच्या अंतरावरील असलेल्या दत्तापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या ईमारतीचे छत उडून गेले आहे.

घाटंजी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

यावेळी सुटलेल्या वाऱ्यामुळे गावातील सुमारे 30 घरावरील टिनपत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे धान्य आणि घरातील वस्तूची मोठी नासाडी झाली आहे. या वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसनाबाबत तहसीलदारांना माहिती देण्यात आली आहे. तर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी गावकस्थांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details