महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावरगड ग्रामपंचायत : नागरिकांसाठी झिजतो म्हणून निवडून येतो; हरिद्वार खडके दहाव्यांदा विजयी - सावरगड ग्रामपंचायत यवतमाळ

यवतमाळ तालुक्याचे लक्ष लागलेल्या सावरगड ग्रामपंचायतवर अपराजित पॅनलने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

Haridwar Khadke
Haridwar Khadke

By

Published : Jan 19, 2021, 8:26 PM IST

यवतमाळ - पंचेचाळीस वर्षापासून गावातील राजकारणात सक्रिय असून कुठलेही काम असो हरिभाऊ खडके हे सदैव तत्पर असतात. यवतमाळ तालुक्याच्या ठिकाणी तहसील, पंचायत समिती, जिल्हापरिषद, पोलीस स्टेशन कुठलेही काम जरी पडले तर ते स्वतः जाऊन ते काम करून आणतात. सोबतच गावातील विकासाच्या योजनाही खेचून आणतात म्हणूनच प्रत्येक वेळी निवडून येत असल्याची प्रतिक्रिया 73 वर्षांच्या हरिद्वार खडके यांनी दिली.

हरिद्वार खडके - विजयी उमेदवार, सावरगड

यवतमाळ तालुक्याचे लक्ष लागलेल्या सावरगड ग्रामपंचायतवर अपराजित पॅनलने आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत ट्रिपल हॅट्रिक मारली असून सलग 10 निवडणुका जिकण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

सावरगड ग्रामपंचायत

अनेक पक्षांचा निधी आणतात खेचून

आमदार, खासदार, मंत्री कुणीही असोत त्यांच्या सर्वांसोबत त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांचा निधी आणून गावात विकासात्मक कामे करतात यातूनच सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र , पशुवैद्यकीय रुग्णालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तलाठी कार्यालय, रस्ते, नाल्या, समाज मंदिरे, शौचालय आणि अनेकांना घरकुलाचा लाभही त्यांनी मिळवून दिला.

सावरगड ग्रामपंचायतमधून हरिद्वार खडके दहाव्यांदा विजयी

पुन्हा सरपंच पदाचे दावेदार

सावरगाव येथील हरिभाऊ खडके यांनी 1972 मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहिला विजय संपादित केला. आणि उपसरपंच झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत ते निवडून आले. 1972 ते 2020 या कालावधीत 20 वर्षे सरपंच, 15 वर्षे उपसरपंच तर दोन वेळा सदस्य असे तब्बल 45 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गावाचा कारभार चालवला. तसेच या दहावी ग्रामपंचायत निवडणुकीतही ते अपराजित राहिले आहेत. काँग्रेस समर्थीत परिवर्तन पॅनलला पाच तर भाजपला चार जागा मिळाल्या आहेत. खडके यांच्यामुळे सावरगड येथील निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details