महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हरिभाऊ खडके... सावरगड पंचक्रोशीचा अपराजित योद्धा

1972 मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उडी मारली आणि 45 वर्षापासून अपराजित योद्धा म्हणून पंचक्रोशीतील ओळख निर्माण केली.

हरिभाऊ खडके... सावरगड पंचक्रोशीचा अपराजित योद्धा
हरिभाऊ खडके... सावरगड पंचक्रोशीचा अपराजित योद्धा

By

Published : Jan 11, 2021, 7:30 AM IST

Updated : Jan 11, 2021, 7:55 AM IST

यवतमाळ - वय वर्षे 73 पण तरुणांनाही लाजवेल अशी काम करण्याची आजही उर्मी. पहाटे पाच वाजल्यापासूनच त्यांची दिनचर्या सुरू होते, ते रात्री दहा वाजेपर्यंत. 1972 मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उडी मारली आणि 45 वर्षापासून अपराजित योद्धा म्हणून पंचक्रोशीतील ओळख निर्माण केली. यावर्षी पुन्हा विरोधकांना सळो की पळो करण्यासाठी ते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ते व्यक्तीमत्व म्हणजे यवतमाळ शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगड या गावातील रहिवासी हरिद्वार खडके हे होय.

सावरगड पंचक्रोशीचा अपराजित योद्धा

हरिद्वार खडके हे गावासह पंचक्रोशीत हरिभाऊ म्हणूनच परिचित आहे. मागील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कधीही हार स्वीकारली नाही, उलट प्रत्येक निवडणुकीत मताधिक्क्याने ते निवडून आले. एक अपराजित योद्धा म्हणून ग्रामपंचायतीच्या राजकारणात यशस्वी कारकीर्द निर्माण केली आहे.

हरिभाऊ खडके... सावरगड पंचक्रोशीचा अपराजित योद्धा
उपसरपंच पदापासून झाली सुरुवातसावरगाव येथील हरिभाऊ खडके यांनी 1972 मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहिला विजय संपादित केला आणि उपसरपंच झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत ते निवडून आले. 1972 ते 2020 या कालावधीत 20 वर्षे सरपंच, 15 वर्षे उपसरपंच तर दोन वेळा सदस्य असे तब्बल 45 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गावाचा कारभार चालवला. या दरम्यान त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सण 2000मध्ये निवडून आणली आता ते यंदाची दहावी ग्रामपंचायत निवडणूक लढवीत असून त्यांना आजही विजयाची खात्री आहे.
सावरगड पंचक्रोशीचा अपराजित योद्धा
नागरिकांसाठी झिजतो म्हणून निवडून देतात-मागील पंचेचाळीस वर्षापासून गावातील राजकारणात सक्रीय असून कुठलेही काम असो हरिभाऊ खडके हे सदैव तत्पर असतात. यवतमाळ तालुक्याच्या ठिकाणी तहसील, पंचायत समिती, जिल्हापरिषद, पोलीस स्टेशन कुठलेही काम जरी पडले तर ते स्वतः जाऊन ते काम करून आणतात. सोबतच गावातील विकासाच्या योजनाही खेचून आणतात.गावात विकासाची अनेक कामेसावरगड या दोन हजार लोकवस्तीच्या गावात अनेक विकासात्मक कामे त्यांनी आपल्या कारकिर्दीत केली. त्यातूनच सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय रुग्णालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तलाठी कार्यालय, तीन अंगणवाड्या, व्यायाम शाळा, सावरगाव हेटी येथे प्राथमिक शाळा, गावात पाण्याची मुबलक व्यवस्था, काँक्रीट रस्ते, नाल्या, समाज मंदिरे, शौचालय आणि अनेकांना घरकुलाचा लाभ ही त्यांनी मिळवून दिला. वयाच्या सत्तरीतही तरुणाला लाजवेल असा आत्मविश्वास आणि विकासाचा ध्यास त्यांच्यात पाहावयास मिळतो.
सावरगड पंचक्रोशीचा अपराजित योद्धा
शरद पवार आले होते प्रचारालासन 1978 मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात हरिभाऊ खडके उभे असताना शरद पवार हे थेट नागपूरवरून पांढरकवडा मार्गाने तळेगाव येथे त्यांच्या प्रचाराला आले होते. तर पवार साहेबांच्या कापूस दिंडी आणि अनेक आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि तेव्हापासूनच ते आजतागायत राजकारणात सक्रीय आहेत.
सावरगड पंचक्रोशीचा अपराजित योद्धा
अपराजित म्हणूनच पॅनल केले उभेसावरगड येथे ग्रामपंचायतीवर नऊ सदस्य निवडून द्यावयाचे आहे. त्यामुळे हरिभाऊ खडके यांनी आपल्या पॅनलचे नावाच अपराजित ग्रामविकास आघाडी असे ठेवले आहे. यामध्ये युवकांना ही त्यांनी संधी दिली आहे. तर आपली दहावी पंचवार्षिक निवडणूक ते लढत आहे. ही निवडणूक जिंकतात का हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. गावातील युवक त्यांच्या पाठीशी असून याच पॅनेलचा विजय होईल अशी आशाही त्यांना आहे.
Last Updated : Jan 11, 2021, 7:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details