यवतमाळ -जिल्ह्यातील जिम आजपासून (दि. 7 जून) सुरू करण्यात आले आहेत. यामुळे फिटनेस प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून जिम बंद होते. जिम सुरू करावे, यासाठी राज्य शासनाकडे फिटनेस प्रेमींनी अनेक वेळा मागणी केली होती. कोरोना टाळण्यासाठी शरीरातील प्रतिकार क्षमता आवश्यक असते. ही प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी जिममध्ये व्यायाम करणे महत्त्वाचे असल्याचे फीटनेस प्रेमींचे म्हणणे होते.
जिल्ह्यात दिडशेवर फिटनेस सेंटर