यवतमाळ - ट्रकमधून होत असलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. राळेगाव तालुक्यातील देवधरी घाटात वडकी पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये 65 लाखांचा अवैध गुटका व ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुड्डू कोरी (३८) आणि जगजीवणलाल कुमार (२३) दोघेही रा. घाटमपूर, इलाहबाद उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आले आहे.
राळेगाव तालुक्यातील देवधरी घाटात वडकी पोलिसांनी गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. पेट्रोलिंग करताना मिळाली गोपनीय माहिती
राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. यावेळी ठाणेदार विनायक जाधव यांना हैद्राबाद येथून वडकीमार्गे नागपूरला एका ट्रकमध्ये अवैध गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक पथक देवधरी घाट परिसरात रवाना करीत सापळा रचण्यात आला. दरम्यान, संशयित ट्रक (टिएस १२ युए १२२८) थांबवून चौकशी करण्यात आली असता, जवळपास ५५ लाखाचा अवैध गुटखा ट्रकमध्ये आढळून आला.
गुन्हे दाख
या प्रकरणी पोलिसांनी ट्रक आणि गुटखा असा एकूण ६१ लाख ५५ हजार ३४० रूपयाचा मुद्देमाल जप्त करीत ताब्यात घेतलेल्या गुड्डू कोरी वय ३८ वर्ष आणि जगजिवणलाल कुमार या दोघांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आला. ही कारवाई वडकी ठाणेदार विनायक जाधव, पोलिस उपनिरिक्षक मंगेश भोंगाडे, कर्मचारी विनोद नागरगोजे, विलास कनाके, विलास जाधव, विकास धडसे, सुरज चिव्हाणे, रूपेश जाधव, शुभम सोनुले, विकेश घ्यावर्तीवार, शंकर जुमनाके, प्रदीप भानारकर, अविनाश चिक्राम, आकाश कुदुसे यांनी पार पाडली.