यवतमाळ- राळेगावपासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतरगावात नातवानेच आपल्या आजीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निखिल मोरेश्वर राऊत (वय -20) याने आपल्या आजीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला ठार केले आहे.
हेही वाचा - 'त्या' बेपत्ता तरुणाचा अनैतिक संबंधातून खून; मृतदेहाचा सांगाडा सापडल्याने खूनाचा छडा
शकुंतला राऊत (वय - 70) असे खून करण्यात आलेल्या आजीचे नाव आहे. निखिल राऊत हा नेहमी आपल्याच मनस्थितीत राहत होता. मात्र, त्याची आजी त्याला नेहमी काही तरी काम कर, असे समजावून सांगत असे. याचाच राग मनात धरुन निखिलने आजीचा खून केला.
हेही वाचा - चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, 9 दिवस फ्रीजमध्ये ठेवला मृतदेहाचा अर्धा भाग
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी निखिल राऊतला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे यांच्या मार्गदर्शनात भगवान मेश्राम, राहुल मोकडे करत आहेत.