यवतमाळ -ग्रामसेवकाने ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी तब्बल ५० हजाराची लाच बांधकाम करणाऱ्याला मागितली आहे. यातील पंचवीस हजार रुपये स्वीकारताना ग्रामसेवकास रंगेहात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. हा प्रकार आर्णी तालुक्यातील सुकळी येथील ग्रामपंचायत येथे घडला.
यवतमाळमध्ये ग्रामसेवकास पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले हेही वाचा - सांगलीमध्ये सोन्याच्या दुकानातुन तब्बल दोन किलो सोने कारागिराने पळवले
ग्रामसेवक नरहरी राठोड (वय-३८) ग्रामपंचायत सुकळी येथे कार्ररत आहेत. त्यांनी २४ सप्टेंबरला पडताळणी दरम्यान पंचासमक्ष तक्रारदाराला ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाचे बिल काढुन देण्याकरीता ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यात रक्कमेचा पहिला टप्पा २५ रुपये प्रथम स्वीकारण्याचे आणि उर्वरीत लाच रक्कम नंतर स्वीकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. त्यावरून बुधवारी सापळा रचून ग्रामसेवक नरहरी राठोड यांना अटक केली आहे.
गजानन जाधव यांच्या मार्फत धनादेश पाठवला होता. त्यांनी हा धनादेश आर्णी शहरातील संस्कृती बिल्डींग मटेरियल या दुकानात तक्रारदारास दिला. राठोड ग्रामसेवक यांचे सांगण्यावरुन तक्रारदारकडून रकमेचा पहिला टप्पा २५ रुपये पंचासमक्ष स्वीकारला. यावरुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपअधिक्षक राजेश मुळे हे करत आहेत.
हेही वाचा - परिवहन कार्यालयातील एजंटांच्या मदतीने भावानेच केली भावाची फसवणूक