महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये नऊ महिन्यापासून ग्रामसेवक बेपत्ता; ग्रामस्थांची बीडीओकडे तक्रार - यवतमाळ ग्रामसेवक बातमी

चोरंबा येथील महिला उपसंरपंच शोभा कलार्दें यांनी ग्रामसेवक गायब असल्याची तक्रार घाटंजी पंचायत समीतीचे गट विकास अधिकारी मंगेश आरेवार यांच्याकंडे केली.

ग्रामस्थांची बीडीओकडे तक्रार

By

Published : Nov 6, 2019, 7:25 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात घाटंजी तालूक्यातील चोरंबा येथील सरपंच गेल्या सहा महिन्यापासून सूट्टीवर आहे. तर ग्रामसेवकाने नऊ महिन्यापासून चोरंबा गावात पायच ठेवला नाही. एकीकडे परतीच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. गावात विजेचा लपंडाव नेहमी चालू राहतो. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळत नाही, अशा अडचणी गावात निर्माण होत आहेत.

ग्रामवासीयांची बीडीओकडे तक्रार

हेही वाचा-पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय

त्यामुळे चोरंबा येथील महिला उपसंरपंच शोभा कलार्दें यांनी ग्रामस्थांना सोबत घेवून ग्रामसेवक गायब असल्याची तक्रार केली. ही तक्रार घाटंजी पंचायत समीतीचे गट विकास अधिकारी मंगेश आरेवार यांच्याकंडे केली.

ABOUT THE AUTHOR

...view details