महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात - yavatmal grampanchayat election voting

925 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. 925 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला होता. त्यापैकी 55 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. एक हजार 346 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायत मतदानाला सुरुवात
यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायत मतदानाला सुरुवात

By

Published : Jan 15, 2021, 10:54 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. 925 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला होता. त्यापैकी 55 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. एक हजार 346 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. दोन ग्रामपंचायतीत निवडणूक प्रक्रिया होणार नाही. त्यामुळे 925 ग्रामपंचायतीसाठी दोन हजार 832 केंद्रांवर मतदान मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायत मतदानाला सुरुवात

जिल्ह्यात 14 लाख मतदार
जिल्ह्यात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र म्हणून शाळा नियुक्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीचे क्षेत्रातील दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृह, व्यापारी औद्योगिक उपक्रम व इतर आस्थापनेतील कामगारांना देखील सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

सहा हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त
ग्रामपंचायतीचे राजकारण म्हटले तर गावांमध्ये गटातटाचे राजकारण सुरू होते. अशातच मतदान केंद्रावर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरती दोन पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावरती असे सहा हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हेही वाचा -कर्नाटकमध्ये डंपर-टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात, ११ ठार

ABOUT THE AUTHOR

...view details