महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus: संकटातील देवदूत.. 'राम धान्य मदत किट'; पाच हजार गरजूंना अन्नधान्य वाटप - Madan Yerawar

5000 गरजूंना 5 किलो गव्हाचे पीठ, 3 किलो तांदूळ, 1 किलो तेल,1 किलो चना, साबण, 1 मीठ पुडा, मोट, बटबटी, बेसन, पोहा, साखर, चहा पावडर इत्यादी जीवनावश्यक साहित्याची किट्स तयार करून वाटप करण्यात आले.

By

Published : Apr 4, 2020, 11:14 AM IST

यवतमाळ- कोरोना प्रादूर्भावास नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन घोषित केल्यामुळे शहरातील गोर गरीब, श्रमिक, कष्टकरी, निराधार, अपंग, विधवा अशा पाच हजार गरजूंना नगरसेवक डॉ. प्रा. प्रविण प्रजापती यांच्या संकल्पनेतून 'राम धान्य मदत किट' तयार करून वितरित करण्यात आले.

Coronavirus: संकटातील देवदूत-राम धान्य मदत किट; पाच हजार गरजूंना अन्नधान्य वाटप

शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या गव्हाची जवळपास 250 क्विंटल गहू खरेदी करून तो निवडून व स्वच्छ करण्याचे काम गरजू महिलांना देण्यात आले. हे करताना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत पीठ तयार करण्याचे काम हाती घेतले. बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा गहू विक्री करता आले. तसेच गरजू महिलांना रोजगार सुद्धा प्राप्त झाला.

5000 गरजूंना 5 किलो गव्हाचे पीठ, 3 किलो तांदूळ, 1 किलो तेल,1 किलो चना, साबण, 1 मीठ पुडा, मोट, बटबटी, बेसन, पोहा, साखर, चहा पावडर इत्यादी जीवनावश्यक साहित्याची किट्स तयार करून माजी पालकमंत्री तथा आमदार मदन येरावार, डॉ. प्रा. प्रविण प्रजापती, मुन्ना दुबे यांच्याहस्ते गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमात जवळपास 50 पेक्षा अधिक स्वयंसेवक हँड ग्लोव्हज, सेफ्टी मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करत सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कता बाळगून सेवा कार्य सुरु आहे

ABOUT THE AUTHOR

...view details