यवतमाळ- प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोगाद्वारे विविध पिकांचे उत्पादन घेऊन आर्थिक समृद्धी साधत आहेत. शेतीतंत्रातील त्यांच्या या अनुभवाचा फायदा राज्यातील इतर शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी पाच हजार प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाने संकेतस्थळावर 'रिसोर्स बँक' या नावाने जपणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर राज्यातील पाच हजार प्रयोगशील शेतकरी यांची माहिती मिळणार आहे.
यवतमाळ : शेतकऱ्यांसाठी प्रयोगशील शेतकऱ्यांची 'रिसोर्स बँक' तयार..
फळबाग, खरीप, रब्बी, उन्हाळी या तीनही हंगामात जे शेतकरी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करुन कमी खर्चात, कमी एकर जमिनीमध्ये जास्त उत्पादन घेऊन आपली आर्थिक उन्नती साधत आहे. अशा शेतकऱ्यांची माहिती या रिसोर्स बँकेद्वारे इतर शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या रिसोर्स बँकेचे उद्घाटन खैरगाव (दे.) येथे प्रयोगशील शेतकरी महेंद्र नैताम आणि कृषीमंत्री दादाजी भुसे, वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते करण्यात आले. राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती सर्वांना व्हावी व इतरांनादेखील त्यांच्यापासून मार्गदर्शन घेता यावे, म्हणून आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या साडेतीन हजार शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. मात्र, लवकरच ही यादी पाच हजार शेतकऱ्यांची करण्यात येणार आहे.