महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राणेंच्या मंत्रीपदाने कोकणात शिवसेनेला फरक पडणार नाही- उदय सामंत

नारायण राणे यांना मंत्रीपद दिल्याने त्याचा कुठलाही फरक कोकणातील शिवसेनेवर पडणार नाही, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

minister uday samant
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

By

Published : Jul 9, 2021, 9:43 PM IST

Updated : Jul 9, 2021, 10:24 PM IST

यवतमाळ - केंद्र शासनाने कोकणाला मंत्रिपद दिले असो किंवा राज्यात दिलेले चार पद असो, त्याचा कुठलाही फरक शिवसेनेवर पडणार नाही. उलट आणखी जोमाने शिवसेना कामाला लागली आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज यवतमाळ येथे दिली.

प्रतिक्रिया देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

पुढे प्रीतम मुंडे यांच्याबद्दल बोलताना सामंत म्हणाले की, सामनाचेच म्हणणे नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हेच म्हणणे आहे, की ज्या मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी संघटना तयार झाली तीचं अस्तित्व दिल्लीत तयार झालं, ते नसताना त्यांच्या कुटूंबावर अन्याय करणं हे महाराष्ट्रालासुद्धा आवडलं नाही. त्यामुळे सामनाचे ते मत नसून, महाराष्ट्रचे ते मत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

प्रॅक्टिकल आधी होतील -

ऑनलाइन एजुकेशन सिस्टीम असताना विद्यार्थी शिक्षक यांच्यात समनव्यय असला पाहिजे. प्रॅक्टिकल केले पाहिजे असं वाटतं पणस, सध्या तशी परिस्थिती नाही. त्यामुळे जेव्हा कधी शाळा, कॉलेज सुरू होतील तेव्हा आधी प्रॅक्टिकल होतील, असेही सामंत यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पाठवलेले कॉन्सनट्रेटर निकृष्ट दर्जाचे -

केंद्र शासनाने महाराष्ट्रात पाठवलेले कॉन्सनट्रेटर निकृष्ट दर्जाचे असून, महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरित करण्यात आले. सध्या महाराष्ट्रात जवळपास दोन हजाराच्यावर कॉन्सनट्रेटर अडगळीत पडले आहेत. यात यवतमाळ जिल्ह्यातील 35 पैकी 21 नादुरुस्त असल्याचीही माहिती प्रशासनाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत. उलट राज्य सरकारवर टीका केली जाते, हा प्रकार राज्यातील जनतेसमोर यावा, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली.

Last Updated : Jul 9, 2021, 10:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details