यवतमाळ -घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथील सोनाली विलास गजघाटे या तरुणीने राहत्या घरात विष घेऊन आत्महत्या केली.
लग्न तोंडावर... पण घरात पैसा नाही; पितृछत्र हरपलेल्या तरुणीची बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्या - yawatmal girl sucide before marriage
घरात गरीबीची परिस्थिती तसेच कमावणारा कोणीच नाही. जवळ पैसा नाही आता लग्न कसे होणार ह्या विवंचंनेने सोनालीने आपली जिवनयात्रा संपविली.
बोहल्यावर चढण्यापूर्वी तरुणीची आत्महत्या; 7 मे रोजी होता लग्नाचा मुहूर्त
तरुणीचे वडील मरण पावले होते. तर आई अपंग आहे. चार बहिणींपैकी दोघींचे लग्न झाले आहे. आता सोनालीचे लग्न 7 मे रोजी ठरले होते. मात्र, घरात गरिबीची परिस्थिती तसेच कमावणारा कोणीच नाही. जवळ पैसा नाही आता लग्न कसे होणार या विवंचनेने सोनालीने आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पारवा पोलीस करीत आहे.