महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुगार अड्ड्यावर धाड, सात अटकेत; घाटंजी पोलिसांची कारवाई - जुगार अड्डा

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. असे असताना पत्त्यांचा जुगार मांडून साथरोग नियंत्रण कायद्याचाच खेळ करणाऱ्यांवर यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी कारवाई केली आहे.

Ghatanji police raid on Gambling Base Yawatmal
घाटंजी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा यवतमाळ

By

Published : Apr 6, 2020, 8:32 PM IST

यवतमाळ - घाटंजी तालूक्यातील शिरोली येथे मागील अनेक दिवसपासून जुगार खेळला जात असल्याची माहिती घाटंजी पोलीसांना मिळाली. त्यानुसार आज (सोमवार) दुपारच्या सुमारास पोलिसांनी सदर जुगार अड्यावर धाड मारली. यावेळी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले असून जुगाऱ्यांकडून 2,950 रूपये जप्त करण्यात आले. दरम्यान या कारवाई वेळी 8 जुगारींनी घटनास्थळावरून पळ काढला होता, त्या फरारी जुगाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

घाटंजी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा...

हेही वाचा...'लॉकडाऊन'च्या काळात भाजप नगरसेवकाच्या फार्महाऊसवर जुगारअड्डा; पोलिसांनी मारला छापा

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात संचारबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतानाही नागरिक या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळेच पत्त्यांचा जुगार मांडून साथरोग नियंत्रण कायद्याचाच खेळ करणाऱ्यांवर यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी कारवाई केली आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शुक्ला यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक घोगरे, जमादार मेशरे यांनी ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details