यवतमाळ - उमरखेड तालुक्यातील घमापूर (तांडा) जंगलाच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेले गाव. मात्र, या गावाला एका भयानक आजाराने ग्रासले आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात दरवर्षी १० ते १५ लोकांना किडनीचा आजार होतोय. आत्तापर्यंत जवळपास पंधरा ते वीस लोक या आजारामुळे दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यवतमाळातील घमापूर गावाला किडनीच्या आजाराचा विळखा गावाला दुषित पाण्याचा पुरवठा-
गावाला फ्लोराईडयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे गावातील नागरिक सांगतात. गावात ग्रामपंचायतीकडून वॉटरफिल्टर बसविण्यात आले आहेत. मात्र, ते वर्षातून फार कमी दिवस सुरू असतात. आणि इतर काळात ते धुळखात बंद पडलेले असतात. परिणामी दुषित पाण्याच्या सेवनामुळे गावातील लोक किडनीच्या आजाराने ग्रासले आहेत. किडनीच्या आजारामुळे दरवर्षी गावात २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू होतो.
यवतमाळातील घमापूर गावाला किडनीच्या आजाराचा विळखा गावकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष-
गावकऱ्यांनी अनेकदा याबाबत तक्रारी दिल्या आहेत मात्र, त्या तक्रारींना नेहमीच केराची टोपली दाखवली जाते. त्यामुळे गावात मृत्यूचे तांडव सुरु असताना प्रशासन मात्र, झोपेचे सोंग घेऊल पडले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.
यवतमाळमधील 'घमापूर' एक 'किडनीफेल' गाव तरुणांनाही आजाराची लागण
वृद्धांसोबत गावातील तरुणांनाही या आजाराने सोडले नाही. गावातील अनेक तरुण आज किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. ज्या वयात कुटुंबाची जबाबदारी उचालायची असते त्याच वयात हे तरुण किडनीच्या आजारमुळे त्रस्त आहेत. एकीकडे वाढता आजार आणि दुसरीकडे जगण्यासाठी डायलिसिस सारख्या महागड्या उपचाराचा सामना करावा लागत असल्यामुळे गावकरी हतबल झाले आहेत.
हेही वाचा-आघाडीत बिघाडी? सोनियांचे उद्धवना प्रथमच पत्र, कॉंग्रेस मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार
हेही वाचा-तृतीयपंथियांचा पहिल्यांदाच रंगला भन्नाट रॅम्पवॉक आणि फॅशन शो