महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये गणेश मूर्तीतून 'वृक्षारोपण'; भक्तीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश

हा मूर्तीकार प्लास्टर ऑफ पॅरिस कधीच उपयोगात आणत नसून गणेश मूर्तींमध्ये बिया भरतो. घरचा गणपती उत्सव संपला की ही मूर्ती कुंडीमधल्या पाण्यात जिरवावी. त्यानंतर मूर्तीच्या मातीमध्ये असलेली बी अंकुरेल व झाड तयार होईल.

गणपती मूर्तीतून 'वृक्षारोपण'

By

Published : Aug 31, 2019, 8:55 AM IST

यवतमाळ- निसर्गाचा ऱ्हास होत असल्याने पृथ्वीवर उद्भवणाऱ्या जागतिक समस्यांमुळे आता लोकजागृती होऊ लागली आहे. जिल्ह्यातील आर्णीमधील मूर्तीकाराने मातीपासून तयार केलेल्या गणपतींच्या मूर्तींमधूनच वृक्षारोपण करण्याची संकल्पना साकार केली आहे. अशा शंभर गणेश मूर्ती त्याने तयार केल्या आहेत. सागर अनिल अस्वार, असे या युवक मूर्तीकाराचे नाव आहे.

सागर अस्वार या मूर्तिकाराने बनवल्या मातीत बिया टाकून गणपती मूर्ती

हेही वाचा - महापुराचे भान ठेवून गणेशोत्सव साजरा करणार; पुण्यातील गणेश मंडळांची भूमिका

काय आहे संकल्पना-

हा मूर्तीकार प्लास्टर ऑफ पॅरिस कधीच उपयोगात आणत नसून गणपतीच्या मातीच्या मूर्तीमध्ये बिया भरतो. घरचा गणपती उत्सव संपला की ही मूर्ती कुंडीमधल्या पाण्यात जिरवावी. त्यानंतर मूर्तीच्या मातीमध्ये असलेली बी अंकुरेल व झाड तयार होईल. त्यासाठी आधीच त्याने हा प्रयोग करून पहिला असून गणपती जिरवलेल्या कुंडीतील मातीत झाड उगवले आहे. हा मूर्तीकार घरी उपलब्ध असलेल्या फळांच्या व इतर बिया मूर्तीमध्ये भरतो व अश्याप्रकारे आस्थेसोबतच वृक्षारोपणही होते.

हेही वाचा - बाप्पाच्या आगमनाची लगभग सुरु; इमिटेशन ज्वेलरीला मागणी वाढली

ABOUT THE AUTHOR

...view details