महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये दोन तरुणांवर टोळक्याचा सशस्त्र हल्ला; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर - यवतमाळमध्ये दोन तरूणांवर सशस्त्र हल्ला

शहरातील वाघापूर नाका परिसरात टोळक्याने दोन तरुणांवर सशस्त्र जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

yavatmal
यवतमाळमध्ये दोन तरूणांवर टोळक्याचा सशस्त्र हल्ला; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

By

Published : Dec 10, 2019, 7:50 PM IST

Updated : Dec 11, 2019, 12:37 AM IST

यवतमाळ -शहरातील वाघापूर नाका परिसरात टोळक्याने दोन तरुणांवर सशस्त्र जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.विनय राठोड (20 रा. वाघापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर आकाश वानखडे (21 रा. वाघापूर) असे जखमीचे नाव आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून विनयचा खून केला. तर आकाशवरही हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. आकाशला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यवतमाळमध्ये दोन तरुणांवर टोळक्याचा सशस्त्र हल्ला

हेही वाचा - अल्वपयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराला 'राम'नगर सुद्धा अपवाद नाही

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

हेही वाचा - यवतमाळमध्ये चोरीचे प्रकार सुरूच; बनावट चावी वापरून चोरट्यांनी लांबविला सहा लाखांचा मुद्देमाल

सदर युवकांवर हल्ला कोणी व का केला? हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

Last Updated : Dec 11, 2019, 12:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details