महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मित्रानेच केला मित्राचा खून; काही तासांमध्येच उलगडले योगेशच्या हत्येचे गूढ - murder in yavatmal

मारेगाव येथील योगेश रामभाऊ गहुकर (वय 28) हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तासिका तत्वावर निर्देशक म्हणून कार्यरत होता. 1 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता वाहनचालक परवाना काढण्यासाठी तो मारेगाव येथील घरातून वणी येथे जाण्यास निघाला. परंतु, रात्री उशिरापर्यत घरी न आला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मारेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

यवतमाळमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून

By

Published : Nov 4, 2019, 7:23 PM IST

यवतमाळ- वणी येथील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ शनिवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हत्या करून हा मृतदेह टाकल्याचे समोर आले होते. याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आरोपी सापडल्याने खुनाचे कारण स्पष्ट झाले असून चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मित्रानेच मित्राचा खून केल्याचे समोर आले आहे.

यवतमाळमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून

हेही वाचा - चाकण खराबवाडीत किरकोळ वादातून एकाची कोयत्याने हल्ला करुन हत्या

मारेगाव येथील योगेश रामभाऊ गहुकर (वय 28) हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तासिका तत्वावर निर्देशक म्हणून कार्यरत होता. 1 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता वाहनचालक परवाना काढण्यासाठी तो मारेगाव येथील घरातून वणी येथे जाण्यास निघाला. परंतु, रात्री उशिरापर्यत घरी न आला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मारेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

बेपत्ता झाल्यापासून त्यांच्या कुटुबीयांनी काही लोकांना सोबत घेऊन शोधाशोध सुरू केली होती. तसेच पोलीसही योगेशचा शोध घेत होते. अखेर दुपारी 4 वाजताच्या सुमारास वणी शहराजवळील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ पोलिसांना योगेशचा मृतदेह आढळला. कुटुंबीयांनी पाहणी करून सदर मृतदेह हा योगेशचा असल्याची खात्री केली.

पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत काही तासांमध्येच दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी राजू रामकृष्ण भोंगळे (रा. मारेगाव) व सुशांत बाळनाथ पुनवटकर (रा. कोलगाव ता. मारेगाव) यांना अटक केली. त्यांनी पैशाच्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास एपीआय माया चाटसे करत आहेत. योगेशच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details