महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार : स्वातंत्र्य संग्रामसेनानी प्राणजीवन जाणी यांनी दिला आठवणींना उजाळा - independence day update

भारताच्या सुवर्णक्षितिजावर पारतंत्र्याचे काळे ढग होते, भारतमाता गुलामगिरीच्या श्रृंखलेत जखडलेली होती. अशावेळी त्या नागरिकांनी कुठलीही पर्वा न करता स्वातंत्र्यलढ्यात उड्या घेतल्या होत्या. यातीलच एक स्वातंत्र्य संग्रामसेनानी प्राणजीवन जाणी यांनी यवतमाळ शहरात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा दिला.

प्राणजीवन जाणी

By

Published : Aug 15, 2019, 5:11 AM IST

यवतमाळ - भारताच्या सुवर्ण क्षितिजावर पारतंत्र्याचे काळे ढग होते, भारतमाता गुलामगिरीच्या श्रृंखलेत जखडलेली होती. अशावेळी त्या नागरिकांनी कुठलीही पर्वा न करता स्वातंत्र्यलढ्यात उड्या घेतल्या होत्या. यातीलच एक स्वातंत्र संग्रामसेनानी प्राणजीवन जाणी यांनी यवतमाळ शहरात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा दिला.

त्याकाळी आंदोलन करण्याचे एकमेव ठिकाण आझाद मैदान हे होते. या मैदानाला एक मोठा इतिहास आहे. या मैदानाला पूर्वी 34 कलम मैदान असे म्हणत. हे मैदान हेतुत: तयार करण्यात आले होते. विशेषत: १९४२ नंतर सभा, मिरवणुका किंवा लोकांना एकत्र करण्यासाठी म्हणून या मैदानाचा वापर होऊ लागला. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्व प्राप्त झालेला हिंदी शब्द 'आझाद मैदान' हे नाव वापरले जाऊ लागले.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा


या मैदानावर पुढाऱ्यांची भाषणे सार्वजनिक जाणिवांच्या सभा येथे होऊ लागल्या. यात गाजलेली सभा १९१७ साली झाली. तेव्हा लोकमान्य टिळक यवतमाळला आले होते. त्या दरम्यान अनेक मोठ्या सभा आझाद मैदानावरच झाल्या. कितीही मोठ्या गर्दीला सहज सामावून घेण्याचे कसब या मैदानात होते. १९४२ च्या आंदोलनाच्या सभा कितीतरी लोकांना आठवत असतील. चले जाव चळवळीतल्या त्या सभा लोकांना जशाच्या तशा लक्षात असतील. त्या काळात यवतमाळला झालेल्या सभा, प्रार्थना सभा अशांनी मैदान भरगच्च होत. हे वैभव आझाद मैदानाने पाहिले आहे. संत गाडगेबाबासुद्धा या मैदानाने पाहिले आहे. महात्माजींच्या पदस्पर्शाने पावन होणं अनुभवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details