महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivsena Worker Murder Case : यवतमाळच्या शिवसैनिक हत्या प्रकरणात चौघे अटकेत.. पोलीस कोठडीत रवानगी - सुनील डिवरे हत्या प्रकरणात चौघांना अटक

यवतमाळ येथील शिवसैनिक सुनील डिवरे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली ( Four Arrested In Sunil Divre Murder Case ) आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यवतमाळच्या शिवसैनिक हत्या प्रकरणात चौघे अटकेत.. पोलीस कोठडीत रवानगी
यवतमाळच्या शिवसैनिक हत्या प्रकरणात चौघे अटकेत.. पोलीस कोठडीत रवानगी

By

Published : Feb 4, 2022, 10:41 PM IST

यवतमाळ : शिवसैनिक सुनील डिवरे यांची तीन फेब्रुवारीला घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आज चौघांना ताब्यात घेतले ( Four Arrested In Sunil Divre Murder Case ) आहे. वैभव सोननकर, पवन सोननकर, रोहीत भोपळे आणि सुरेश पाथरीकर अशी त्या चौघांची नावे असून, या चौघांना न्यायालयात हजर ८ फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

यवतमाळच्या शिवसैनिक हत्या प्रकरणात चौघे अटकेत.. पोलीस कोठडीत रवानगी

पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

ग्रामीण भागात जनमत असलेल्या नवोदित नेत्याची गोळ्या झाडून हत्या केल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेमकी हत्या का केली हे पोलीस तपासात पुढे येईल. मात्र, यवतमाळमधील राजकारण सध्या या घटनेने चांगलेच तापले आहे. सुनिल डिवरे यांच्या छातीत आणि पोटात दोन गोळ्या लागल्याने व धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. सुनील डिवरे यांच्या डोक्यावर आणि हातावर सुध्दा धारदार शस्त्राने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. भांब राजा गावातील घरासमोर गोळीबार झाल्याने गावात तणावाचे वातावरण पसरले होते.

पत्नीसमोर हा सगळा थरार

सुनील डिवरे सध्या यवतमाळ कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक होते. शिवाय ते मागील वेळी भांबराजा ग्रामपंचायतमध्ये सरपंच होते. यंदा त्यांची पत्नी अनुप्रिया डिवरे या सरपंच आहेत. घटनास्थळी त्यांच्या पत्नीसमोर हा सगळा थरार झाल्याने त्यांच्या पत्नीने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देत दिली आहे. सुनील डिवरे यांचा तीन वर्षापूर्वी गावातील पवन सोननकर, वैभव सोननकर यांच्या सोबत शाळा समितीच्या अध्यक्षपदावरून वाद झाला होता. त्या शाळा समितीच्या निवडणुकीनंतर डिवरेचे विरोधी गट असलेल्या सोननकर यांनी डिवरे यांच्या घरासमोर फटाके फोडले होते. तेव्हा हाणामारी झाली होती. त्यातून पवन सोननकर, वैभव सोननकर, रोहित भोपळे, सुरेश पाथरीकर यांनी माझ्या घरी येऊन माझ्या पतीला बाहेर बोलावून त्यांच्यावर गावठी पिस्तुलने तीन फायर केले. तसेच कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. तसेच दोन वर्षांपूर्वी अतिक्रमण काढण्यातून याच गावातील रामू जयस्वाल, अमर जयस्वाल यांच्या वाद झाला होता. तेव्हा सुनील डिवरे यांना जीवानिशी मारण्याची धमकी दिली होती. त्यातून या सगळ्यांनी एकत्र येत माझ्या पतीची हत्या केल्याची तक्रार सुनील डिवरेची पत्नी अनुप्रिया डिवरे यांनी ग्रामिण पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पवन सोननकर, वैभव सोननकर रोहित भोपळे, सुरेश पाथरीकर या चार जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून शस्त्र जप्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details