महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चार सट्टेबाजांना पोलिसांनी केली अटक, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त - यवतमाळ पोलीस बातमी

यवतमाळ शहरात ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 लाख 57 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात.

मुद्देमाल व आरोपींसह पोलीस पथक
मुद्देमाल व आरोपींसह पोलीस पथक

By

Published : Dec 29, 2020, 6:48 PM IST

Updated : Dec 29, 2020, 7:23 PM IST

यवतमाळ - शहरात सुरू असलेल्या ऑनलाइन क्रिकेट सट्टाबाजीवर पोलिसांची धाड टाकून चार सट्टेबाजांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख तीन लाख 18 हजार रुपयांच्या रोकडसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी केली.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

ऑस्ट्रेलियातील बिग बैश क्रिकेट स्पर्धेवर सट्टा

ऑस्ट्रेलिया येथे बिग बैश क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान अडीलेट विरुद्ध पर्थ हा सामना चालू असताना दरम्यान शहरात ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी व सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे यांच्या पथकाने नितीन उर्फ राम चिमणलाल शर्मा (रा. आठवडी बाजार) यांच्या घरी महिला अत्याचार कक्ष व सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. सट्टा खेळणारे आणि खेळविणाऱ्यांना अटक करण्यात आली. इतरही सूत्रधारांचा शोध पोलीस घेत आहेत.

चार जणांना केली अटक

या कारवाईमध्ये राम चिमनलाला शर्मा (वय 32 वर्षे), निलेश नान्हे (वय 26 वर्षे), दुर्गेशसिंग मोतीसिंग राणा (वय 24 वर्षे, तिघेही रा. आठवडी बाजार) व विक्रम गहरवाल (वय 32 वर्षे) साईमंदिर या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक हॉटलाइन, 16 मोबाईल कनेक्शन असलेली एक बॉक्स, एक लॅपटॉप, प्रिंटर, एलईडी टीव्ही, 25 मोबाईल, दुचाकी वाहन, तीन लाख 18 हजार 860 रोख रक्कम, असा एकूण 6 लाख 57 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात.

हेही वाचा -मारहाण प्रकरणी खासदार भावना गवळींवर गुन्हा दाखल

हेही वाचा -यवतमाळ; गोठ्याला आणि घराला भीषण आग; शेळ्यांसह कोंबड्या जळून खाक

Last Updated : Dec 29, 2020, 7:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details