यवतमाळ -उत्तरवार रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. हनुमंत संताराम धर्माकारे ( Hanumant Dharkare Murder ) यांची उमरखेड पुसद रोडवर साखळे महाविदयालय समोर 11 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात ( 4 Arrest In Hanumant Dharkare Murder ) आली आहे. सैय्यद तौसिफ सैय्यद खलील (३५), सैय्यद मुस्ताक सैय्यद खलील (३२), शेख मौहसिन शेख कय्युम (३४), शेख शहारुख शेख आलम (२७) सर्व रा. ढाणकी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अब्रार (२२) हा फरार असून त्याच्या शोधासाठी दहा पथके गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली.
'या' कारणासाठी केली हत्या -
4 मे 2019 रोजी शेख अरबाज शेख अब्रार याचा शिवाजी चौक उमरखेड येथे अपघात झाला होता. त्या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळी त्याला रुग्णालयात आणले, त्यावेळी उत्तरवार रुग्णालयात डॉ. हनुमंत धर्माकारे कर्तव्यावर हजर होते. डॉ. धर्माकारे यांच्या हलगर्जीपणामुळेच अपघातातील जखमीचा मृत्य झाल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी त्यावेळी केला होता. यासंदर्भात पोलीसांनी गुन्हादेखील नोंदवला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपी ऐफाज ऊर्फ अप्पु शेख अनार (२२) याने त्याचे मामा सैय्यद तौसिफ सैय्यद खलील (३५) रा. ढाणकी व त्याच्या इतर मित्रांच्या मदतीने डॉक्टरवर यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.