महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेशनच्या तूरडाळ आणि चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात आढळली - Yavatmal

स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी स्वाईप मशिनचा वापर होत आहे. मात्र, आता या स्वाईप मशिनवरही विक्रेत्यांनी जालीम उपाय शोधला आहे. त्याची साक्ष या रिकाम्या पाकिटांनी दिली. स्वस्त धान्य विक्रेत्यांच्या ‘चोरवाटा’ ही यानिमित्ताने उघड झाल्या आहेत.

रेशनच्या तूरडाळ आणि चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात आढळली

By

Published : May 14, 2019, 10:41 PM IST

यवतमाळ -गरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानात येणाऱ्या तूर आणि चणाडाळीची हजारो रिकामी पाकिटे चक्क जंगलात फेकून देण्यात आली. सोमवारी सकाळी यवतमाळ-अमरावती मार्गावरील पांढरीच्या जंगलात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे रेशनची लाखोंची तूरडाळ खुल्या बाजारात विकली गेल्याचे स्पष्ट होत आहे. ही पाकिटे फेकणारा विक्रेता शोधण्याचे आव्हान पुरवठा विभागापुढे आहे.

रेशनच्या तूरडाळ आणि चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात आढळली

स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी स्वाईप मशिनचा वापर होत आहे. मात्र, आता या स्वाईप मशिनवरही विक्रेत्यांनी जालीम उपाय शोधला आहे. त्याची साक्ष या रिकाम्या पाकिटांनी दिली. स्वस्त धान्य विक्रेत्यांच्या ‘चोरवाटा’ ही यानिमित्ताने उघड झाल्या आहेत.

गरिबांना स्वस्त दरात डाळ मिळावी म्हणून पुरवठा विभागाने तूरडाळ आणि चणाडाळीचा पुरवठा सुरू केला आहे. रेशन दुकानातून वितरित झालेली डाळ रेकॉर्डवर यावी म्हणून स्वाईप मशिनचाही वापर केला जात आहे. विक्री करण्यात आलेली तूरडाळ आणि चणाडाळ स्वाईप मशिनवर आली आहे. मात्र, ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचली नाही. म्हणूनच डाळीची रिकामी पाकिटे जंगलात फेकली गेली.

स्वस्त धान्य दुकानातून विक्री झालेले तूर आणि चणाडाळीचे पाकीट ग्राहकांनी खरेदी केली. ते पाकीट पुन्हा दुकानदारांनी कमी दरात खरेदी केले. खरेदी झालेले तूर आणि चणाडाळीचे पाकीट रिकामे करून खुल्या बाजारात विकले गेले. त्यावर डबल नफा कमवला आहे. खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० रूपये किलो आहे. तर स्वस्त धान्य दुकानात ही डाळ ५० रूपये किलोने विकली जात आहे. यामुळे तूरडाळीतून विक्रेत्यांना क्विंटलमागे तीन हजारांचा नफा होणार आहे. त्यासाठीच हा गैरप्रकार झाला आहे. चणाडाळ बाजारात ६५ रूपये किलो आहे. तर स्वस्त धान्य दुकानात ४० रूपये आहे. क्विंटलमागे दीड हजार रूपयांचा नफा मिळतो. कमी वेळात अधिक नफा मिळविण्यासाठी हा गोरखधंदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details