महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा धसका; जिल्ह्यात आणखी एक रुग्ण आढळला कोरोना बाधित; रुग्णाचा आकडा वाढला

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 9 झाली आहे. ही व्यक्ती हा एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य आहे.

Corona Virus
कोरोना कक्ष

By

Published : Apr 20, 2020, 4:13 PM IST

यवतमाळ- आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 9 झाली आहे. ही व्यक्ती हा एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य असून तो 9 एप्रिलपासून आयसोलेशन वॉर्डात भरती आहे.

तपासणीसाठी त्याचे पहिले नमुने 9 एप्रिलला पाठविण्यात आले होते. तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर 19 एप्रिलला परत नमुने पाठविले असता, या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांनी आपल्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वत: समोर येऊन प्रशासनाला माहिती द्यावी. त्यानंतर आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या सर्वच पॉझिटिव्ह रुग्णावर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचार सूरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details