यवतमाळ- वंचित समाजातील बारा बलुतेदारांच्या विविध मागण्यासाठी पाच जानेवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर देशव्यापी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार तथा आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
वंचितांच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन
वंचित समाजातील बारा बलुतेदार पारधी, गोवारी, भटके-विमुक्त, बेरोजगार, बचत गट, शेतकरी-शेतमजूर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, विशेष मागास वर्ग, अल्पसंख्यांक यांच्या अल्पसंख्यांक यांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी अद्यापही प्रलंबित आहे. शासनाकडे विविध पद्धतीने मागण्या, मोर्चे, निवेदने देण्यात आले. मात्र याची कुठलीच दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळेच या मोर्चाचे आयोजन मुंबईतील आझाद मैदानावर करण्यात आले आहे. वंचितांच्या हक्कासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचेही माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न रेंगाळणार -