यवतमाळ -घाटंजी तालुक्यातील महिलेने माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी बुधवारी आमदार संजय राठोड यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे.
महिलेने नोंदवला 14 ऑगस्टला जबाब
महिलेकडे शरीर सुखाची मागणी प्रकरण : माजी मंत्री संजय राठोड आज नोंदवणार जबाब - माजी मंत्री संजय राठोड उद्या जबाब नोंदविणार
माजीमंत्री संजय राठोड यांचा जबाब नोंदवल्यानंतर विशेष चौकशी समिती दोन्ही जबाब तपासून अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देणार आहे. त्यानंतर माध्यमांना या प्रकरणातील वस्तुस्थिती सांगितली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे.
आमदार संजय राठोड यांनी शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात स्पीड पोस्टाने पाठविण्यात आली होती. या प्रकरणी एसआयटीची स्थापन करण्यात आली होती. त्यात ज्या महिलेने तक्रार दिली, त्या महिलेचा सुद्धा जबाब 14 ऑगस्टला घाटंजी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. माजीमंत्री संजय राठोड यांचा जबाब नोंदवल्यानंतर विशेष चौकशी समिती दोन्ही जबाब तपासून अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देणार आहे. त्यानंतर माध्यमांना या प्रकरणातील वस्तुस्थिती सांगितली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे.
हेही वाचा -धक्कादायक! नाशिकमधील प्रांताधिकाऱ्याची नियत घसरली, तलाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी