यवतमाळ - टिपेश्वर अभायारण्यालगत असलेल्या वागरा टाकळी येथे एका गुराखी शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविला. यामध्ये गुराखी शेतकऱ्याच्या मानेला व पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. ही गंभीर घटना 26 नोव्हेंबरला सांयकाळी 5च्या सुमारास घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराखी शेतकऱ्याची वनमंत्री संजय राठोड यांनी आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सेनापती बिजाराम राऊत (32, रा. वागरा टाकळी) असे जखमीचे नाव आहे.
वाघाच्या हल्ल्यात जखमी शेतकऱ्याची वनमंत्र्यांनी घेतली भेट - yavatmal farmer news
हल्ल्यात गुराखी शेतकऱ्याच्या मानेला व पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. ही गंभीर घटना 26 नोव्हेंबरला सांयकाळी 5च्या सुमारास घडली. यात जखमी झालेल्या गुराखी शेतकऱ्याची वनमंत्री संजय राठोड यांनी आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार
गुराखी सेनापती राऊत हे शेळ्या चारून घरी परत येत असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला चढविला होता. आरडा-ओरडा करून यातून त्यांनी वाघाच्या तावडीतून सुटका करून घेतली होती. तोपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपचारार्थ पारवा ग्रामीण रुग्णालयात भरती केले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून, लवकरच सुटी मिळणार आहे. वनविभागाकडून लवकरच मदत देण्यात येईल, असे आश्वासन राठोड यांनी दिले.