यवतमाळ- मंत्रीमंडळ हे एक टीम वर्क आहे. या टीमचे उद्धव ठाकरे प्रमुख आहे. कोणाला कोणते खाते आहे यापेक्षा मी त्यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री आहे हे महत्त्वाचे असल्याचे वनमंत्री संजय राठोड म्हणाले. त्यांच्याकडे असणारे मदत व पुनर्वसन खाते विजय वडेट्टीवार यांना दिले. याबाबत त्यांना विचारले असता ते बोलत होते.
खाते मिळण्यापेक्षा मी कॅबिनेट मंत्री आहे हे महत्त्वाचे - संजय राठोड - वनमंत्री संजय राठोड
विजय वडेट्टीवार यांना भूकंप आणि पुनर्वसन खाते दिले होते. हे दुय्यम दर्जाचे खाते असल्यामुळे वडेट्टीवार नाराज होते. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे असलेले मदत व पुनर्वसन खाते वडेट्टीवारांना दिले. त्यामुळे आम्ही संजय राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले, मदत व पुनर्वसन खाते कुठल्याही मंत्र्याला दिले तरी ते चांगले काम करतील.

विजय वडेट्टीवार यांना भूकंप आणि पुनर्वसन खाते दिले होते. हे दुय्यम दर्जाचे खाते असल्यामुळे वडेट्टीवार नाराज होते. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे असलेले मदत व पुनर्वसन खाते वडेट्टीवारांना दिले. त्यामुळे आम्ही संजय राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले, मदत व पुनर्वसन खाते कुठल्याही मंत्र्याला दिले तरी ते चांगले काम करतील. माझ्याकडे असते तर मी देखील चांगले काम केले असते. तरीही आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
हे वाचलं का? - विजय वडेट्टीवारांची नाराजी अखेर दूर... खात्याचा पदभारही स्वीकारला