महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

३३ कोटी वृक्ष लागवडीच्या भानगडीची चौकशी होणार, वनमंत्री राठोडांनी दिले आदेश

वृक्ष लागवडची चळवळ महाराष्ट्र शासनाने राबवली आहे. पुढेही राबवली जाईल. कुठ जर अनियमितता झाली असेल, झाडं वाचली नसतील तर याची चौकशी होईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे राठोड म्हणाले.

minister sanjay rathod
वनमंत्री संजय राठोड

By

Published : Feb 21, 2020, 9:30 PM IST

Updated : Feb 21, 2020, 9:44 PM IST

यवतमाळ - युती शासनाच्या काळात 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये मोठी अनियमितता झाल्याची तक्रार आली आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तक्रार केली. तसेच वृक्ष लागवडीबाबत इतर आमदारांच्याही भरपूर तक्रारी आल्या आहेत. याची दखल घेऊन वृक्षलागवडीची चौकशी करण्याचे आदेश प्रधान सचिव यांना दिल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

हेही वाचा- सीएएला घाबरण्याची काहीही गरज नाही, मुख्यमंत्री ठाकरेंचे मोदी भेटीनंतर स्पष्टीकरण

हेही वाचा- उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौराLIVE : अडवाणींच्या भेटीनंतर ठाकरे अमित शाहांच्या निवासस्थानी दाखल..

३३ कोटी वृक्ष लागवडीच्या भानगडीची चौकशी होणार

वृक्ष लागवडची चळवळ महाराष्ट्र शासनाने राबवली आहे. पुढेही राबवली जाईल. कुठ जर अनियमितता झाली असेल, झाडं वाचली नसतील तर याची चौकशी होईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे राठोड म्हणाले. तर सुधीर मुनगंटीवार यांनी या वृक्ष लागवडची न्यायालयीन चौकशी करावी असे म्हटले होते. यावर बोलताना राठोड म्हणाले की, सन्मानीय सुधीर भाऊ ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना वाटलं असेल परंतू, अशी मागणी आमच्या सहकारी मंत्र्यांनी केली नाही. विभागाच्या माध्यमातून त्यांचे पत्र आले असल्याचे राठोड म्हणाले.

Last Updated : Feb 21, 2020, 9:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details