महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळची पाच वर्षीय मनस्वी विशाल पिंपरे राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित - यवतमाळ स्केटर मनस्वी विशाल पिंपरे

मनस्वी विशाल पिंपरे (वय ४ वर्ष ८ महिने) हिने स्केटिंग या खेळातून राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय स्तरावरील अनेक सुवर्णपदके पटकावले आहे. आत्तापर्यंत 38 गोल्ड मेडल 5 सिल्व्हर मेडल व 5 ब्राँझ मेडलसह स्केटिंग मध्ये 14 बुक ऑफ रेकॉर्ड व गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मनस्वीची नोंद झालेली आहे.

five year old manasvi vishal pimpre of yavatmal honored with national sports award
यवतमाळची पाच वर्षीय मनस्वी विशाल पिंपरे राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित

By

Published : Sep 6, 2022, 12:32 PM IST

यवतमाळ नुकत्याच 29 ऑगस्ट 2022 रोजी मानपाडा ठाणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा अधिवेशन 2022 तथा मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त नॅशनल स्पोर्ट डे चे औचित्य साधून विविध खेळातून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये मनस्वी विशाल पिंपरे (वय ४ वर्ष ८ महिने) हिने स्केटिंग या खेळातून राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय स्तरावरील अनेक सुवर्णपदके पटकावले आहे. आत्तापर्यंत 38 गोल्ड मेडल 5 सिल्व्हर मेडल व 5 ब्राँझ मेडलसह स्केटिंग मध्ये 14 बुक ऑफ रेकॉर्ड व गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मनस्वीची नोंद झालेली आहे.

मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत, सुवर्णलक्ष नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड आणी मास्टर चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपूर्ण भारतातून 152 खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये मनस्वी वयाने सर्वात लहान होती. पुरस्कार मिळण्यामागे तिचे प्रशिक्षक विजय मलजी सर यांचा सिंहाचा वाटा आहे. याशिवाय तिची महाराष्ट्र खेल पुरस्कार करिता निवड झालेली आहे. मनस्वी सध्या रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी पुणे येथे प्रशिक्षण घेत असूनयेत्या काळात स्केटिंग या खेळातून जागतिक स्तरावर ऐतिहासिक विक्रम स्थापित करणार आहे. तीला पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details