महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ : पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल - यवतमाळ गु्न्हे वार्ता

एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार यवतमाळमधील उमरखेड येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

yavatmal 5 year old girl sexually abused
यवतमाळ : पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

By

Published : May 27, 2021, 5:03 PM IST

यवतमाळ - उमरखेड शहरातील साणकवाडी येथील एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी शेख नजीर शेख उस्मान दौला (50) याच्यावर पोस्को अंतर्गत उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया

आरोपी फरार -

या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. चिमुकली दूध आणण्याकरिता आरोपीच्या घरी गेली असता शेख नजीर शेख उस्मान दौला (50) याने मुलीसोबत गैरवर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एका व्हिडीओ क्लिपमुळे हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

हेही वाचा - लसीकरणाच्या मुद्द्यावरून प्रियंका गांधींनी केंद्राला विचारले तीन प्रश्न

ABOUT THE AUTHOR

...view details