यवतमाळ - राज्य शासनाच्या जलसंपदा मंत्रालयाने जिल्ह्यातील पुसद व आर्णी येथील लघु पाटबंधारे विभागाची पाच कार्यालये एक ऑगस्टपासून बंद करण्याचे आदेश काढले आहे. ही कार्यालये यवतमाळ जिल्हा प्रकल्प बांधकाम विभागाला येत्या काही दिवसात हलविण्यात येत असून या स्थानांतरणाचा फटका लाभार्थी शेतकऱ्यांना बसणार आहे. या बंद करण्यात येणाऱ्या कार्यालयामध्ये लघु पाटबंधारे विभाग पुसद व निम्नपैनगंगा पुनर्वसन विभाग आर्णी या विभागांचा समावेश आहे. आदेशामुळे तीनही तालुक्यातील शेतकर्यांमध्ये असंतोष असून कार्यालयांचे स्थानांतर झाल्यास उग्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
लघुपाटबंधारे विभागाच्या पाच कार्यालयांना लागणार कुलूप अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण
पुसद विभाग अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग क्रमांक २ पुसद व उपविभाग क्रमांक ३ आर्णी तर निम्न पैनगंगा पुनर्वसन विभाग आर्णी अंतर्गत उपविभाग क्रमांक एक आर्णी, उपविभाग क्रमांक दोन पुसद व उपविभाग क्रमांक ३ आर्णी या पाच कार्यालयांचे कामकाज बंद करून या कार्यालयातील कामे यवतमाळ मुख्य कार्यालयात वर्ग करण्यात येणार आहे. तसेच अभियंते व कर्मचारी यांना नव्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात येणार आहे.
पाच कार्यालयांना लागणार कुलूप शेतकऱ्यांना मारावे लावणार हेलपाटे
पुसद व आर्णी येथील लघु पाटबंधारे बंद करण्याच्या जलसंपदा विभागाचा हा निर्णय महागाव, उमरखेड , पुसद तालुक्यातील जवळपास तीन हजार लाभार्थी शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. सदर कार्यालय बंद होत असल्यामुळे विविध योजनांसाठी लागणारे कागदपत्रे आणि प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आता शेतकऱ्यांना २०० किलोमीटरचे अंतर पार करून यवतमाळच्या चकरा माराव्या लागणार आहेत.