यवतमाळ - आर्णी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ट्रान्सपोर्ट ट्रकचा पाठलाग करून पाच लाखांचा अवैध गुटखा व 10 लाखांचा ट्रक असा 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दुपारी चार वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पाच लाखांचा अवैध गूटखा जप्त; आर्णी पोलिसांची कारवाई
आर्णी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ट्रान्सपोर्ट ट्रकचा पाठलाग करून पाच लाखांचा अवैध गुटखा व 10 लाखांचा ट्रक असा 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दुपारी चार वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला ट्रक
अमरावतीवरुन ट्रान्सपोर्ट ट्रक (एमएच 31 एपी 3622) मध्ये अवैध गूटखा असल्याची गोपनिय माहिती आर्णी पोलीस स्टेशनचे जमादार मनोज भगवान चव्हाण यांना मिळाली. त्यानूसार एपीआय मनोहर पवार आणी जमादार मनोज भगवान चव्हाण यांनी दूचाकीने ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग करून दिग्रस रोड ऊडान पूलाजवळ सदर ट्रक पकडला. ट्रकची झडती घेतली असता ट्रान्सपोर्ट मालासह ट्रकमध्ये विमल पान मसाला, गोल्ड सुंगधीत तंबाखू, ए-वन असे अवैध गूटखाचे वीस पोते किंमत 5 लाख 44 हजार 268 रुपये तसेच ट्रक किंमत 10 लाख असा एकूण 15 लाख 44 हजार 268 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रक चालक कैलास दिंगाबर माकेश्वर (42 रा.अमरावती) याला अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार पिंताबर जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय मनोहर पवार,जमादार मनोज भगवान चव्हाण, अमित झेंडेकर, मिथुन जाधव, मनोज नूरसिंग चव्हाण यांनी केली.