महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वणी तालुक्यातील कोंबडबाजारावर धाड; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त - वणी बातमी

वणी तालुक्यातील पिंपरी जंगलात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 5 लाख 44 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक आरोपी व मुद्देमालासह पोलीस पथक
अटक आरोपी व मुद्देमालासह पोलीस पथक

By

Published : Dec 1, 2020, 8:23 PM IST

वणी (यवतमाळ) - तालुक्यातील पिंपरी जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर छापा टाकून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी पाच जणांना अटक करण्यात आली. जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्यांदा कोंबड बाजारावर पोलिसांनी छापा टाकला आहे.

वणी तालुक्यात सर्वाधिक कोंबडबाजार

वणी तालुक्यातील कायर बीट अंतर्गत पिंपरी येथे जंगलात काही व्यक्ती पैशावर कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत आहेत, असी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहून लागताच 10 ते 15 व्यक्तींनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत 5 जणांना ताब्यात घेतले व मुद्देमाल जप्त केला.

साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी धाड टाकलेल्या कोंबडबाजारातील घटनास्थळावरून एकूण 5 लाख 44 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांच्यामार्गदर्शनात पोलिसांनी केली.

हेही वाचा -यवतमाळ : पीपीई किट घालून बजावला मतदानाचा हक्क

हेही वाचा -शिक्षक मतदारसंघात शिक्षकच उमेदवार हवा; शिक्षक संघटनांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details