यवतमाळ - पांढरकवडा येथे फर्निचर दुकानाला आग लागून दुकानातील फर्निचर व मशीन जळून खाक झाले आहेत. तब्बल एक तासाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
पांढरकवड्यात फर्निचर दुकानाला आग; 4 लाखांचे साहित्य जळून खाक - अग्निशमन दल
पांढरकवडा एमएसईबी ऑफिससमोर असलेल्या दत्ताजी बोबडे यांच्या फर्नीचर दुकानाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. पांढरकवडा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आल्यानंतर तब्बल एका तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

पांढरकवडा एमएसईबी ऑफिससमोर असलेल्या दत्ताजी बोबडे यांच्या फर्नीचर दुकानाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. ही बाब शेजारील फ्रुटच्या दुकानात असणाऱ्या माणसाच्या लक्षात आल्याने त्याने यासंदर्भात दुकान मालकाला कळवले. त्यानंतर पांढरकवडा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. तब्बल एका तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या आगीत दुकानातील मशीन व फर्नीचर असा अंदाजे ४ लाखांच्या साहित्याचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविले जात आहे.