वाळू व्यावसायिकांकडून माहिती अधिकार कार्यकर्त्यास विवस्त्र करून मारहाण - चंदन हातगाडे मारहाण
मारहाण करणाऱ्यांवर अॅट्रोसिटीसह अनेक गुन्हे दाखल दाखल आहेत. या नऊ वाळू व्यावसायिकांपैकी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर 5 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. चंदन हातगाडे हा आरटीआय कार्यकर्ता असून त्याने रेती व्यावसायिकांनी खंडणी मगितल्याच्या कारणावरून मारहाण झाली असल्याचीही माहिती समोर येत आहे.
यवतमाळ - वाळू घाटाची माहिती मागणे, ट्रकचे फोटो काढणे या कारणावरून वाळू घाट व्यावसायिकांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास पांढरकवडा रोडवर ही मारहाण झाली. चंदन हातगाडे( रा. नेताजीनगर) असे माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. हातगाडे याने या मारहाणी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वाळू व्यावसायिकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर तब्बल ९ वाळू व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.