महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बनावट कागदपत्राद्वारे मिळवले कंत्राट, २ कंत्राटदारांसह ५ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - विदर्भ पाटबंधारे विभाग न्यूज

विदर्भ पाटबंधारे अंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे प्रकल्पात बनावट कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळवल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा ठरत असून, चौकशी करुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR Registered against contracter for Fake document issues
यवतमाळ

By

Published : Feb 13, 2020, 1:37 AM IST

यवतमाळ - विदर्भ पाटबंधारे अंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे प्रकल्पात बनावट कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळवल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा ठरत असून, चौकशी करुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंत्राटदार भास्कर माने, संजय काळभोर ( दोघेही रा.पुणे) यांच्यासह तत्कालीन नागपूर जलसंपदा अधीक्षक अभियंता मो. ई. शेख, अकोला अधीक्षक अभियंता एस.डी. कुलकर्णी, ख.ल. खोलापूरकर गोसेखुर्द अधीक्षक अभियंता, प्र.भ. सोनवणे नाशिक सिडिओ, आर. एस. सोनटक्के कार्यकारी अभियंता यवतमाळ मध्यम प्रकल्प आदींवर यवतमाळच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील महागाव लघु पाटबंधारे प्रकल्पात बनावट कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळवल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...राष्ट्रगीताने होणार महाविद्यालयीन कामकाजाची सुरुवात, अंमलबजावणीला शिवजंयतीचा मुहूर्त

बनावट प्रमाणपत्र तयार करून ती खरे आहेत, असे भासवून कंत्राट मिळवने, तसेच तत्कालीन पूर्व अहर्ता समितीने या प्रमाणपत्राची कुठल्याही स्तरावर पडताळणी न करता कंत्राटदारास लाभ पोहोचवून कंत्राट दिले आहे. अपात्र ठरू शकणाऱ्या कंत्राटदारास निविदा कामे देण्यात आली आहेत. हे सर्व प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा ठरत आहेत. त्यावरून 465,465,471,474,420,34 भादवी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अनव्ये अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details