यवतमाळ - कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यातही हातावर पोट असणाऱ्यांना सर्वाधिक झळ पोहचत आहे. यवतमाळमधील दिव्यांग उमेश धोटे यांनाही याचा चांगलाच फटका बसला आहे. खेळणी विकून होणारे उत्पन्न हे त्यांच्या उदरनिर्वाहाचा एकमेव साधन. लॉकडाऊनमुळे जीवन जगण्याचे हे एकमेव साधन गेल्या दीड महिन्यापासून बंद पडले आहे. त्यामुळे या हालाखीच्या परिस्थितीत दिव्यांग उमेशचे जीवनही लॉक झाल्याचे चित्र दिसत आहे.
लॉकडाऊनमुळे दिव्यांग उमेशचे जीवनच झालेय 'लॉक'.. खेळणी विकून करायचा उदरनिर्वाह हेही वाचा.....अखेर तळीरामांचा घसा होणार ओला; 'या' भागातील वाईन शॉप उघडण्यास सशर्त परवानगी
यवतमाळच्या पिंपळगाव येथील उमेश धोटे हे दिव्यांग असून ते शहरभर पायी फिरून लहान मुलांची खेळणी विक्री करतात. मात्र, महिनाभरापासून त्यांचा हा व्यवसाय बंद आहे. सध्या ते एका भाड्याच्या घरात पत्नी आणि आईसह राहतात. त्यांच्यावरच कुटुंबाचा सर्व भार आहे. मात्र लॉकडाऊन मुळे सारंकाही ठप्प झालं आहे.
उमेश मागील दहा वर्षांपासून खेळणी विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून त्यांचा व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. त्यांच्या जवळ घरभाडे द्यायलाही पैसे नाही. आता प्रत्येक गोष्ट काटकसरीने करावी लागते. पण काटकसर किती करायची, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबापुढे आहे. उमेशची आई दोन घरची धुणीभांडी करून घर चालवत आहेत. लॉकडाऊनपूर्वी त्या दोघांच्या परिश्रमावर घर चालत होते.