यवतमाळ - घरी तीन एकर शेती. यात पारंपरिक पद्धतीने कापूस, सोयाबीन, तूर लागवड करत होतो. पण दरवर्षीच शेतीवर कुठले ना कुठले संकट यायचे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी उत्पादनात घट आल्याने नेहमीच तोटा सहन करावा लागत होता. अशातच मराठवाड्यात कीर्तनाचा कार्यक्रम करण्यासाठी गेलो असता तेथील फळबाग पहिली. आणि आपल्या शेतातही अशाच फळबाग शेती करण्याचा निर्धार केला. आज तीन एकरामध्ये 130 झाडे अंजिराची, 200 झाडे पेरूची, 105 झाडे ॲप्पल बोरची, केसर आंबा 500 झाडे, श्वेत चंदन 110 दहा झाडे आणि सुरू शंभर झाडांची लागवड केली. पहिल्याच वर्षी अंजीर आणि पेरू फळ पिकातून पावणे दोन लाखाचे उत्पादन घेतले असल्याचे सुनील राऊत या शेतकऱ्याने सांगितले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री
कोरोनाच्या काळामध्ये पेरू आणि अंजीर या पीएकाची व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर यांच्या माध्यमातून जाहिरात केली. व्यापारी व बाजारपेठेत त्याची विक्री न करता कुणाच्याही मध्यस्तीविना थेट ग्राहकांना घरपोच या फळांची विक्री करू लागलो. सुनील महाराज यांनी पिकलेल्या फळाला औरंगाबाद, चिखली, खामगाव, जळगाव, जाफराबाद, चाळीसगाव येथपर्यंत बसवर माल पाठवित आहे.
सर्व पिकांना ठिबक, जैविक खते