यवतमाळ- राळेगाव ते यवतमाळ रस्त्यावरील राणा जिनींगसमोर मार्कंडेय वसतीगृहाजवळ स्त्री जातीचे मृत अर्भक आज सकाळच्या सुमारास आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या अर्भकाची तपासणी केली असता ते मृत असल्याचे आढळून आले.
यवतमाळच्या राळेगावात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक - crime
राळेगाव कळंब रोडवरील वसतिगृहाजवळ भगवान कुमरे यांच्या लेआउटमधील खुल्या जागेमध्ये रात्रीच्या सुमारास स्त्री जातीचे अर्भक अज्ञातांनी दफन केल्याची तक्रार शैलेश मोहिजे यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात दिली.

राळेगावात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक
यवतमाळच्या राळेगावात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक
राळेगाव कळंब रोडवरील वसतिगृहाजवळ भगवान कुमरे यांच्या लेआउट मधील खुल्या जागेमध्ये रात्रीच्या सुमारास स्त्री जातीचे अर्भक अज्ञातांनी दफन केल्याची तक्रार शैलेश मोहिजे यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात दिली.
या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक शाम सोनटके व कर्मचारी घटनास्थळावर पोहचले. अर्भक ताब्यात घेऊन ते वैद्यकीय तपासणीकरीत पाठवण्यात आले. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध राळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.