महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिमुकल्यासह वडिलाची मांगुळ कारखाना येथे गळफास घेऊन आत्महत्या - yavatmal news today

मागील वर्षी मृत संजयच्या संदीप नामक मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता, तेव्हापासून ऊईके परिवार दुःखाच्या सावटाखाली जगत होते. अशा वेदनादायी मानसिकतेत मृत संजयची पत्नी माहेरी गेली होती.

By

Published : Jul 23, 2021, 3:33 PM IST

Updated : Jul 23, 2021, 3:42 PM IST

यवतमाळ - ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत मांगुळ कारखाना येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चिमुकल्या लेकरासह वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय शिवाजी ऊईके (२९) आणि संयोग संजय ऊईके (३) असे मृत बाप-लेकराचे नाव आहे.

पत्नी गेली होती माहेरी

मागील वर्षी मृत संजयच्या संदीप नामक मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता, तेव्हापासून ऊईके परिवार दुःखाच्या सावटाखाली जगत होते. अशा वेदनादायी मानसिकतेत मृत संजयची पत्नी माहेरी गेली होती. नुकतेच संजयने मुलगा संयोग याला सासुरवाडीवरून आणले होते.

गावभर चर्चांना उधाण

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास वडील संजय यांनी मुलगा संयोग याला गळफास लावून आणि नंतर स्वत:गळफास लावला असावा, असा कयास पोलिसांनी बांधला आहे. मात्र संजयने गळफास घेतलेल्या जागी पायाजवळ रक्ताचा थारोळा दिसत असल्याने गावभर चर्चांना उधाण आले आहे. यवतमाळ ग्रामीण पोलीसांनी बाप-लेकाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविले आहेत. पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

Last Updated : Jul 23, 2021, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details