यवतमाळ - घाटंजी येथील वाघाडी नदीत वडिल आणि मुलाच्या बुडून मृत्यू झाला. दोघेही सूर्य ग्रहणानंतर नदी काठावरील शनी मंदिरात पूजापाठ करण्यासाठी गेले होते. संजय शिवाप्रसाद अग्रहारी (वय - 43) व आदित्य संजय अग्रहारी(वय-12) अशी या पितापुत्राची नावे आहेत.
नदी पात्रात बुडून पितापुत्राचा मृत्यू; सूर्य ग्रहणाची विधी करत असतानाची घटना - घाटंजी वडिल-मुलगा मृत्यू
घाटंजी येथील वाघाडी नदीत वडिल आणि मुलाच्या बुडून मृत्यू झाला. आज सूर्यग्रहण असल्याने अग्रहारी कुटुंबांने पुजा आयोजित केली होती. पूजापाठ आटोपल्यावर संजय अग्रहारी मुलासह आंघोळ करण्यासाठी गेले असता दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

नदी
आज सूर्यग्रहण असल्याने अग्रहारी कुटुंबांने पुजा आयोजित केली होती. पूजापाठ आटोपल्यावर संजय अग्रहारी मुलासह आंघोळ करण्यासाठी गेले असता दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी घटनास्थळी भेट दिली. गावकऱयांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.