यवतमाळ - बळीराजा राहतो रुबाबात या उक्तीचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे आला. बळीराजा आपल्या मुलाच्या लग्नाची वरात सजविलेल्या बैल गाडीवरून वाजत गाजत काढली. बळीराजा आपल्या राजा-सर्जाच्या जोडीवर किती प्रेम करतो हे ठाकरे व राऊत या दोन्ही परिवाराने दाखवून दिल आहे. या वरातीची सध्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चा सुरू आहे.
महागड्या वरातीला फाटा
दिग्रस येथील प्रगतशील शेतकरी राजकुमार ठाकरे यांचा मुलगा रोहितचा शुभ विवाह टाकळे पोटेगाव येथील प्रगतशील शेतकरी गणेश राऊत यांची कन्या वैष्णवी हिच्याशी संपन्न झाला. या विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभाच्या वरातीमध्ये घोडा आणि महागड्या चारचाकीला फाटा देत शेतकऱ्याचा अभिमान असलेल्या बैलगाडीवर वरात काढून शेती व शेतकऱ्यांचा सन्मान वाढवला. अतिशय सुरेख पद्धतीने सजविलेल्या बैलगाडीच्या वरातीने सर्व दिग्रसकरांचे लक्ष वेधले होते. या अनोख्या वरातीची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत होत आहे.
हेही वाचा -आधी पीक कर्जाचे व्याज भरा, नंतर शासन देणार थेट भरपाई
हेही वाचा -पावणेदोन लाखांची बोगस किटनाशके जप्त, कृषी केंद्र संचालकाला अटक