यवतमाळ - जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, या पिकांच्या भरपाईपासून शेतकरी वंचित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी तरी कशी साजरी करायची, असा प्रश्न भेडसावत आहे. या गंभीर समस्येची राज्य शासनाने दखल घ्यावी, म्हणून नेर येथे युवा शेतकरी संघर्ष समितीनेच्यावतीने नेर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेतकरी तीन वर्षांपासून अस्मानी सुलतानी संकटात -
मागील तीन वर्षापासून शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. यातून तो अजूनही सावरलेला नाही. कर्जमाफीसारख्या योजनेतून अनेक शेतकरी वंचित आहे. तर यंदा परतीच्या पावसामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. सोयाबीन पीक पूर्णत: नष्ट झाले तर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस पीक सुद्धा हातातून गेले आहे. या विचित्र परिस्थितीत दिवाळीसारखा सण समोर येऊन ठेवलेला आहे. कोरोनासारख्या संकटात अनेक शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम न मिळाल्याने उपासमारीची पाळी आली होती. त्यातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुरते पिक नष्ट झाले आहे.
हेही वाचा -बळीराजा हवालदिल : कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आता 'गुलाबी' संकट