महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार आपले अपयश लपवत आहे.

farmers-in-yavatmal-district-in-crisis
आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर

By

Published : Mar 2, 2021, 7:55 PM IST

यवतमाळ - आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार आपले अपयश लपवत आहे. अधिवेशनात समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शेतकरी नेते मनीष जाधव यांनी दिला आहे.

आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर
अधिवेशनात समस्या निकाली काढा-
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड नैराश्याच्या गर्तेत सापडला असून त्याच जगणे हे निखाऱ्यावरचे झालेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडून आपल अपयश लपवत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. लागवडीचा खर्च निघाला नाही. आणेवारी कमी निघाली मात्र, कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. याकडे मनीष जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून लक्ष वेधले आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघणार काय याकडे लक्ष लागले आहे. असे न झाल्यास शेतकरी स्वाभिमानी संघटनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details