महाराष्ट्र

maharashtra

ओल्या दुष्काळाची मदत कागदावरच; बैलजोड्या विकून जगण्याची बळीराजावर वेळ

By

Published : Jan 2, 2021, 11:57 AM IST

Updated : Jan 2, 2021, 1:08 PM IST

ओल्या दुष्काळाची मदत लालफितशाहित अडकून पडली आहे. काही नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे बळीराजवर आपली बैलजोडी विक्री करून घरखर्च आणि कर्ज फेडण्याची वेळ आली आहे.

ailjodi_viknyac
बैलजोड्या विकून जगण्याची बळीराजावर वेळ

यवतमाळ - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020-21'चा खरीप हंगाम अतिशय बिकट व आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त करणारा ठरला. बनावट बियाणे, अतिवृष्टी, बोन्डअली मुळे पीक हातचे गेले. तर हाती आलेले पीक कोरोना सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाच्या कालखंडात मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. ओल्या दुष्काळाची मदत लालफितशाहितच अडकून पडली आहे. त्यामुळे बळीराजवर आपली बैलजोडी विक्री करून घरखर्च आणि कर्ज फेडण्याची वेळ आली असल्याची खंत अल्पभूधारक शेतकरी प्रल्हाद राठोड या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

बैलजोड्या विकून जगण्याची बळीराजावर वेळ
जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर-लॉकडाउन काळात आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेले असताना देखील शेतकऱ्यांनी तडजोड करत खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र, नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या बोगस बियांण्यामुळे 12 हजार 803 शेतकर्‍यांना दुबार पेरणीला बळी पडावे लागले. त्यापैकी 10 हजार 930 ठिकाणी हे बियाणे पंचनामा अंतर्गत बोगस असल्याचे आढळून आले. त्यापैकी केवळ 821 शेतकऱ्यांना आर्थिक मदतीखाली कृषी विभागाच्या माध्यमातून 275 सोयाबीन बॅग व 51 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांना मात्र, वाऱ्यावर सोडण्यात आले.
बैलजोड्या विकून जगण्याची बळीराजावर वेळ
पालकमंत्र्यांची मदतीची घोषणा ठरली फोलजिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 315 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्यासाठी मागणी केली. त्याचसोबत झालेल्या शेतमालाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा देण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, पालकमंत्री संजय राठोड यांनी केलेली मदतीची घोषणा फोल ठरली. दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पदरात केवळ उपेक्षाचा पडली, असा आरोप शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केला आहे.
Last Updated : Jan 2, 2021, 1:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details